पहिला पाऊस, मराठी, निबंध, प्रसन्गलेखन, pahila paaus marathi vaicharik lekhan.
निबंध लेखन
वैचारिक लेखन
प्रश्न :
पहिला पाऊस या विषयावर वैचारिक लेखन करा.
उत्तर :
पहिला पाऊस
' नेमेचि येतो मग पावसाळा ' असे आपण म्हणत असलो, तरी नियमाप्रमाणे आपण पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. कार्टं त्यापूर्वी ग्रीष्माच्या भव्य कढईत आपल्या देहाची अगदी लाही लाही उडालेली असते, म्हणून म्हणून 'पहिला पाऊस' हा हवा हवासा असणारा पाहून ठरतो. कारण उकडणे जीव नकोस व्हायचा. घरात बसूनसुद्धा चैन पडत नव्हते. पाखरे झाडांच्या फांद्यांवरून बसलेली होती. दूरवर खिडकीतून माळ दिसत होता. रणरणते ऊन त्याला भाजून काढत होते. गुरे झाडाखाली विसावली होती.
सारे कसे शांत वाटत होते; पण सुतकी वातावरण वाटत होते. तेवढ्यात अचानक एक झुळूक आली. ती कुठून तरी पाण्यावर लोळून आली होती. तो ओला स्पर्श अंगाला असा काही सुखकर वाटला ! झाडांची सुद्धा मरगळ नाहीशी झाली. तीही थोडी शहारली. पाखरांनी पंख फडफडविले. गाई-गुरे उभी राहिली. वारा सुटला, धूळ उळाली. धुळीचा उंचच उंच स्टार दिसू लागला. वाकली पाने, काड्या-काटक्या घरात येऊन पडल्या. दारे-खिडक्या धडाधडा आपटू लागली. आकाशात काळे ढग उंच-उंच चढू लागले. ढगांची गंभीर गर्जना ऐकू येऊ लागली. ऊन केव्हा नाहीसे झाले ते कळलेच नाही. चांगलेच अंधारून आले. संध्यकाळ झाल्यासारखे वाटू लागले. विजांचा कडकडाट होऊ लागला.
थोड्याच वेळात विजांनी आपला चमकर दाखवला. चाबकासारख्या लांबच लांब वीज दिसू लागल्या. त्या डोळे दिपवीत होत्या. डोळे दिपवणारी वीज चमकली कि काही वेळाने गडगडाट ऐकू आली. त्यांची गंभीरता वाढली कि मोठी माणसे देखील भेदरून जाऊ लागली. काही लहान मुलांनी आपल्या आईच्या कुशीत डोके लपवली. टपोरे थेम्ब पडू लागले. टप, टप, टप ! काही क्षणात त्यांचा वेग वाढला. पत्र्याचा ताशा वाजू लागला. रस्त्यावर थेंबांचा नाच दिसू लागला. रस्त्याने दोन्ही बाजूंना पाणी वाहू लागले. झाडाखाली बसलेली गुरे मन खाली वाकवून शिंगांवर पाऊस झेलीत जाऊ लागली. चिमण्या, कबुतरेही आपल्या पंखावर पाऊस झेलत होती. उकाड्याने तापलेल्या अंगाला वर्षा निववीत होती.
या पहिल्या पाऊसाने लहान मुळेच नाहीत तर मोठी माणसेही सावधान पावतात. तृषार्त धरतीमाताही ह्या पहिल्या पावसाने तृप्त होते, निवते आणि तिच्या समाधानाच्या परिमल सर्वत्र दरवळतो. त्या मृदगंधानेच तृप्त होऊन मानव पहिल्या पावसाचे पूजन, स्वागत करत असावा असे मला वाटते.
Comments
Post a Comment