प्लास्टिक - वापरावर मर्यादा - पर्याय - जनजागृती , दिलेल्या सूचक शब्दांवर आधारित बातमी.
बातमीलेखन
दिलेल्या सूचक शब्दांवर आधारित बातमी
प्रश्न :
प्लास्टिक - वापरावर मर्यादा - पर्याय - जनजागृती
उत्तर :
प्लास्टिक जनजागृती
(न्यूज नेटवर्क जनमत )
मुंबई, दिनांक १९ जून : पर्यावरणाच्या संरक्षणासाठी तसेच भावी पिढीला आरोग्यदायी वातावरण लाभावे, यासाठी शासनामार्फत प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या २३ जून पासून संपूर्ण महाराष्ट्रावर प्लास्टिकबंदी लागू होणार आहे. त्यामुळे काही अपवादात्मक प्लास्टिक सोडल्यास प्लास्टिक वापरावर मोठ्या प्रमाणात मर्यादा येणार आहे.
प्लास्टिकबंदी होण्यापूर्वी प्लास्टिकला काय पर्याय असू शकतात, याची माहिती मुंबईकरांना देण्यासाठी महानगरपालिकेने २२ ते २४ दरम्यान वरळीत एक प्रदर्शन आयोजित केले आहे.
तसेच प्लास्टिकला पर्याय असलेला केन्व्हास, ज्यूट, कागदी पिशव्या यांचा वापर वाढावा, म्हणून जनजागृती करणयात येणार आहे. पिशव्या, बाटल्या किंवा प्लास्टिकचे रिसायकल कोठे होणार आहे ते ह्या प्रदर्शनात माहिती पडेन.
No
ReplyDeletewhat
Delete