पर्यटक या नात्याने बाळकृष्ण पर्यटन, सांगली या संस्थेकडे काश्मीर सहल माहितीपत्रकाचे मागणी करणारे पत्र लिहा.
मागणीपत्र
जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा :
प्रश्न :
पर्यटक या नात्याने बाळकृष्ण पर्यटन, सांगली या संस्थेकडे काश्मीर सहल माहितीपत्रकाचे मागणी करणारे पत्र लिहा.
उत्तर :
दिनांक : ३ डिसेंबर २०२०
प्रति,
माननीय व्यवस्थापक,
बाळकृष्ण पर्यटन,
श्रीयश पथ, सांगली - ४१५ ११३.
विषय : काश्मीर सहलीच्या माहितीपत्रकाची मागणी करण्याबाबत.
महोदय,
तुमची ' बाळकृष्ण पर्यटन ' ही सांगलीतली एक नामवंत पर्यटनसंस्था आहे. तुम्ही वर्षभर देशभर अनेक सहली नेता. तुमचा सहलखर्च सर्वसामान्यांना परवडणारा आहे, असे आम्ही ऐकले आहे.
यामुळे मे महिन्याच्या सुट्टीत आम्हा मित्र-मैत्रिणीची काश्मीर सहलीला जाण्याचा मानस आहे; परंतु आम्हाला खर्चाचा घ्यायचा आहे. यासाठी काश्मीर सहलीचे माहितीपत्रक मेल केलेत तर बरे होईल. दहावीच्या विद्यार्थ्यांना काही खास सवलत असेल तर, त्याबद्दलही कळवावे.
सहलीच्या वेळी आम्हाला काही खर्च होऊ शकतो का ? इत्यादी बाबत मेलमध्ये स्पष्ट कल्पना दिली तर बरे होईल.
तुमच्या मेलची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.
आपली कृपाभिलाषी,
क. ख. ग.
१०२, कामगार वसाहत,
महात्मा गांधी मार्ग,
शाहूपुरी, कोल्हापूर- ४१६ ०११.
ई-मेल : kkkhg@xxxx.com
Thanks
ReplyDeletewelcome
Delete