प्रदूषण एक समस्या, वैचारिक लेखन, निबंध, pradushan ak samasya vaicharik lekhan.
वैचारिक लेखन
प्रश्न :
प्रदूषण एक समस्या या विषयावर वैचारिक लेखन करा.
उत्तर :
वैचारिक लेखन
अंगावर आदळणारी गर्दी, शहरांचा असह्य वेग, हरतर्हेचे अटळ प्रदूषण, बेकारी, दारिद्र्य, गुन्हेगारी अशा अनेक समस्या भारतापुढे 'आ' वासून उभ्या आहेत. यातील ' प्रदूषण ' हि समस्या तर आपल्याला आरोग्याला घातक अशी आहे.
भारतात औद्योगिकरण आले आणि कारखानदारी वेगाने वाढली. पूर्ण विचाराअभावी आणि नियोगनभावी सुरु झालेल्या कारखानदारीने हवेचे प्रदूषण निर्माण केले हे आपल्या लक्षातसुद्धा आले नाही. तसेच, कारखान्यातील अस्वच्छ, दूषित पाण्यामुळे नद्या व समुद्र यांचे पाणी दूषित झाल्याने ते पिण्यायोग्य राहिले नाही. कितीतरी लोक नदी, कालवा अशा ठिकाणी निर्माल्य, नारळ, नैवेद्य टाकतात. त्यामुळे गंगा-शुद्धीकरणाचा प्रकल्प हाती घ्यावा लागतो. परंतु ते दूषित होणार नाही. प्रदूषण टाळण्यासाठी कारखान्यांभोवती भरपूर झाडे असणे आवश्यक आहे. त्यासाठी कारखान्यांचे विकेंद्रीकरण केले पाहिजे हे लक्षात न घेतल्याने औद्योगिक विभागात प्रचंड प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. आपली अस्वच्छता ठेवतो परंतु सार्वजनिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतो. स्वतःच्या घरातील कचरा रस्त्यावर फेकतो. पान, गुटखा यांच्या पिचकाऱ्या रस्त्यावर टाकल्या जातात. या घाणींमुळे हवा दूषित होतो आणि प्रदूषण वाढते.
पाणी, हवा याबरोबर ध्वनिप्रदूषण हीसुद्धा एक मोठी ज्वलंत समस्या ठरली आहे. कर्कश आणि मानसिक संतुलन बिघडवणाऱ्या मनुष्यास त्रास होतो. आपल्या आसपास वाहने, कारखाने, विमाने, मशीन इ.चा. त्रासदायक आवाज होतो व याचा परिणाम प्रामुख्याने मेंदूवर, किंबहुना संपूर्ण शरीरावर होऊन मनुष्याचे जीवन धोक्यात येते. निद्रानाश, डोकेदुखी, ऐकू कमी येणे यांसारखे विकार जाडतात. अनपेक्षितपणे कर्कश आवाज कानावर आदळल्यास बुबुळे विस्फारतात, आतडी आवळली जाऊन पोटात कला येतात, आणि हि समस्या ठिकाणी आपल्याला अधिक प्रमाणात आढळते.
कारण शहरात जागा कमी आणि लोक जास्त अशी अवस्था आहे. घरे शेजारी शेजारी असतात त्यामुळे. त्यामुळे एका घरातील रेडिओ, टीव्ही चा आवाज दुसऱ्या घरात येतो आणि इच्छा नसताना ते ऐकावे लागते. तसेच आज वेगवेगळे कार्यक्रम, उत्सवप्रसंगी स्पीकर हि एक फॅशनच झाली आहे. आणि आता लोकसंख्येने १३५ कोटींचा आकडा ओलांडला, हे तर आपल्याला माहीतच आहे. तसेच आज वेगवेगळे प्रत्येकाकडे खाजगी वाहन आहे. तसेच बस, ट्रक यासारखी वाहने वरचेवर दुरुस्त केली जात नाहीत आणि त्यामुळे हि प्रचंड प्रमाणात धूर ओकतात. त्या धुरातून कार्बन मोनोऑक्साईड हा विषारी वायू बाहेर पडतो. तो आपल्या शरीराला अपायकारक आहे. त्यामुळे हृदयाचे, श्वसनसंस्थेचे रोग होण्यास संभाव्य असते.सिग्नलच्या ठिकाणी तर वाहने एकच वेळी चालू अवस्थेत असतात आणि त्यामुळे त्यांच्यामाध्यमातून प्रचंड प्रमाणात धूर बाहेर निघतो.
यावर उपाय एकाच ' प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा ' हे सूत्र सगळ्यांना उमगलं पाहिजे. तरच आपली या बिकट समस्येमधन सुटका होऊ शकेल.
Comments
Post a Comment