मला आवडलेले पुस्तक, वैचारिक लेखन, मराठी, निबंध-वैचारिक लेखन-मला पुस्तक, mala aavdlele pustak, vaicharik lekhan marathi
वैचारिक लेखन
प्रश्न :
उत्तर :
मला आवडलेले पुस्तक
' पुस्तकांसारखा परममित्र दुसरा नाही. ' असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे. या वाक्याची सत्यता मला आताशा पटू लागली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी एक वाचनालयाचे सदस्यत्व घेतले. अनेक पुस्तके माझ्या वाचनात आली. 'श्यामची आई ' या पुस्तकाने माझे जिंकले. साने गुरुजींनी वर्णन केलेली आई वाचताना नकळत किती वेळा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागत. पुस्तकातला ' श्याम ' मीच आहे, असे वाटू लागायचे.
आईने श्यामला कसे घडविले याचे वर्णन पुस्तक मी कितीतरी वेळा वाचले आणि त्या पुस्तकाचा परिणाम नकळत माझ्या जीवनावर झाला. आईला दैवत मानण्याइतके शहाणपण माझ्यात आले. तडजोड करण्याची वृत्ती माझ्यात नव्हती. गरिबीविषयी माझ्या मनात चीड होती. मी माझा त्यागा व्यक्त करायचो; पण आता तक्रार न करता, समजुतीच्या चार गोष्टी लहान बहिणीला सांगण्याचे शहाणपण माझ्यात आले आहे. हा सारा श्यामच्या आईचा परिणाम !
या पुस्तकातला एक एक प्रसंग, एकेक वाक्य मनावर संस्कार करणारे आहे. 'अरे श्याम! पायाला घाण लागली तर इतका जपतो. त्यापेक्षा मनाला घाण लागू नये म्हणून जप. ' यांसारखी अनेक वाक्ये म्हणजे मानवी जीवनाला दिशा दाखवणारी दीपस्तंभ आहेत. साने गुरुजींच्या बालपणापासून एकेक प्रसंग वर्णन करीत करीत त्यांच्या मानत देशभक्तीचे बीज कसे रोवले गेले; आई वारल्यानंतर श्यामच्या जीवनात कशी पोकळी निर्माण झाली, स्वतः:ला सावरत भारतमातेची सेवा करण्याची प्रेरणा कशी मिळाली, या सर्व घटना आजही जिवंत वाटतात.
Comments
Post a Comment