रस्त्याचे मनोगत, आत्मकथन, रस्त्याचे मनोगत ह्या विषयावर आत्मकथन करा, रस्त्याचे आत्मकथन, निबंध-मनोगत- आत्मकथन.
आत्मकथन
प्रश्न :
रस्त्याचे मनोगत या विषयावर आत्मकथन करा.
उत्तर :
रस्त्याचे मनोगत
ऊन मी म्हणत होतं. माझी सायकल दादा घेऊन गेला होता आणि मला क्लासला जायचे होते. जर केले नाही तर बाबांचा मार नाहीतर क्लासच्या सरांचे बोलणे बसेल म्हणून मी क्लासला पायी चालत निघाले. रणरणत्या उन्हात रस्ता नुसता तळपत होता. भर दुपार असल्याने रस्त्यावर रहदारी थोडी कमीच होती. मी रोज सायकलवर जाते तर मधीच खड्डे आले तर मी रस्त्यावर वैतागायची आणि बाजूने सायकल घेऊन जायची. पण मी आता रस्त्याने अगदी आत्मयितेने पाहत चालले होते. तर काय गम्मत झाली, रस्ता चक्क माझ्याशी बोलू लागला. "मुली, तू आज माझ्याकडे एवढी आत्मयितेने बघते हे पाहून माझे हृदय अगदी गलबलून आले. नाहीतर ह्या धावपळीच्या जीवनात तुम्हाला माझ्याकडे लक्ष द्यायला किंवा माझ्याविषयी विचार करायला वेळ तरी असतो का? तू आता माझा विचार करत आहेस हे पाहून तुझ्याशी बोलायचे धाडस केले.
अगं, तू जेव्हा खुश असशील शाळेतही जात नसशील तेव्हा इथे फक्त पायवाट होती. माझ्या अवतीभोवती छोट्या-छोट्या झाडांची गर्दी होती. मी रात्रभर त्यांच्या सहवासात राहत असे, परंतु काही कालावधीने लोकसंख्या वाढली आणि माझ्यात विकास व्हावा असे लोकांना वाटले आणि सरकारतर्फे पायवाटेचा चांगला पक्का रास्ता बनविला. नगरपालिकेने रिसारमार्गाने एका कंपनीकडे माझ्यात विकास करण्याचे काम दिले. पण काय सांगू? इतके हाल झाले त्यावेळी मला खणून बाजूला फेकले. माझा जो मित्रपरिवार होता त्यांना उपटून माझ्याबरोबर फेकून दिले. नंतर माझ्यावर खाडी टाकली. केवढा मोठा लोखंडी रूरल फिरवला. खादीचा चक्काचूर झाला आणि नंतर पाणी मारले. मी सगळं मुकाट्याने सहन करत होतो. कारण मी काहीच करू शकत नाही हे त्यांना माहित असल्याने त्यांनी माझे हाल करून सोडले आणि माझे पायवाटेचे रूपांतर रस्त्यात झाले.
Comments
Post a Comment