मी पाहिलेला क्रिकेटचा सामना. प्रसंगलेखन. अनुभवलेखन. मी पाहिलेला क्रिकेटचा सामना या विषयावर प्रसंगलेखन लिहा.

प्रसंगलेखन 

प्रश्न : 

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना या विषयावर प्रसंगलेखन लिहा.

उत्तर : 

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना 

              लहानपणी मित्रांबरोबर क्रिकेटचा खेळ खेळताना मी नेहमी चिडत असे. मला आउट व्हायला आवडत नसे आणि नेहमी तेच माझ्या नशिबी येत असे. मला क्रिकेट खेळण्याची  होती तशी मला बघण्याची खूप आवड असे. खरं तर आपण अनेक सामन्यांचा थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर घरबसल्या पाहतो आणि ते अशक्य असल्यास रेडिओवरून ऐकतो. पण प्रत्यक्ष मैदानात आणि तोही अगदी जवळून एखादा चुरशीचा सामना पाहण्यात आनंद काही वेगळाच असतो. 
             मी पाहिलेलों साच एक चुरशीचा सामना मी कधी विसरणार नाही. हा सामना म्हणजे माझ्या शालेय जीवनातील एक ऎस्मर्णीय प्रसंगच, तेव्हा मी ९वी मध्ये होतो. मंगळवार दि, ३०.३.१९ रोजी भारत-श्रीलंका यांच्यात सामना होता. माझ्या बाबांनी दोनच तिकिटे काढून आणली आणि मला म्हणाले, "मी दोनच तिकिटे काढून आणली आहेत तुझी आई आणि मी जाणार आहे, तुझी परीक्षा तोंडावर आली आहे. तू अभ्यास करत बस." पुढे ते काहीतरी बोलणार होते पण मला ते ऐकेवीन आणि मी भोकाड वासले. काही केल्या रडायचे थांबेना तेव्हा माझ्या आईने माघार घेतली आणि ती घरी बसली, मी बाबांबरोबर क्रिकेट पाहण्यासाठी नेहरू स्टेडियम ला गेलो. गर्दी तर टोबी होती. आम्ही त्या गर्दीतून प्रवेशद्वारात पोहोचलो, तिकिटे दाखवली आणि आतमध्ये गेलो. मला एकाच उत्सुकता लागली होती कि, सचिन तेंडुलकरला खेळताना बघायचे होते. सामन्याला बरोबर नऊ वाजता सुरुवात झाली. मी आणि बाबा एकदम पुढे आणि कडेला होतो. त्यामुळे सचिन तेंडुलकर आणि रंगतुंगा अगदी आमच्या जवळून गेले. मी नकळत सचिनला हातही लावला. ते दोघेही कर्णधार असल्याने मैदानात छापा काटा करण्यास गेले. सचिनने नाणे फेक जिंकली आणि प्रथम बॅटिंग घेतली. मला खूप आनंद झाला. आता प्रथम सचीन खेळायला येणार. मी त्याच्या प्रत्येक कृतीकडे बारकाईने लक्ष देत होतो. त्याच्या बरोबर अजय जडेजा सुदंडशा होता. 
              आपण खेळ खेळताना कसे खेळतो आणि प्रत्यक्षात तो कसा खेळला जातो यातील तफावत मी बारकाईने टिपत होतो. सचिनने आल्याबरोबरच धाव जमवायला सुरुवात केली आणि अजय जडेजालाही तो साथ देत होता. त्या दोघांच्या खेळातून असे अजिबात वाटत नव्हते कि केवळ आपल्याच धाव जास्त व्हाव्यात. दोन्ही धाव कारण्यासाटःई एकमेकांना साथ देत होते. तेवढयात जडेजा धावबाद झाला. मग सचिन कर्णधार असल्याने त्याने परत संत गतीने खेळायला सुरुवात केली. परंतु जसजश्या धावा जमत गेल्या आणि सौरव गांगुलीबरोबर त्याने चांगल्याच धाव जमविल्या. ' माझ्या मनात खरंच सांगतो एकच विचार येत होता कि गांगुली बाद झाला तरी चालेल पण सचिन नको. माझी स्वार्थी भावना खूपं महागात पडली आणि सचिनने खूप जोरात टोला मारला आणि चेंडू रतलुंगाच्या हातात गेला. मला खूप वाईट वाटले. सचिन ग्राउंड मधून खाली मान घालून माघारी येत होता. तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी तरातरले. त्यानंतर माझे सामन्यांकडे नीट लक्षच लागेना. 
             परंतु सचिन नंतर एका पाठोपाठ लगेच सर्वच आऊट झाले. खूप धावांचे आव्हान त्यांनी श्रीलंकेसमोर ठेवले. मला क्रिकेट पाहण्यात रस वाटत नव्हता. पण नंतर त्याचीही तशीच स्थिती झाल्यानंतर मला सामन्यात रस वाटायला लागला. आपण जिंकू अशी अशा वाटायला लागली. पण निराशा झाली. या सामन्याचे मला सुख एवढेच होते कि मी सचिनला जवळून पहिले आणि श्रीलंकेचे सगळे खेळाडू हि अगदी जवळून.

Comments

Other posts

बेडूक - विहीर - समुद्र, मोठे, संकुचित.

पर्यटक या नात्याने बाळकृष्ण पर्यटन, सांगली या संस्थेकडे काश्मीर सहल माहितीपत्रकाचे मागणी करणारे पत्र लिहा.

प्लास्टिक - वापरावर मर्यादा - पर्याय - जनजागृती , दिलेल्या सूचक शब्दांवर आधारित बातमी.

One night, my sleep was suddenly disturbed by some strange noises coming from the direction of the drawing room... - Developing a story.

You are Kedar/kirti More, staying at 5, Gulab Niwas, Wadgaon Village, Ratnagiri, 415 709. Write a letter to your friend telling him how you celebrate cleanliness week. Make use of points given in the poster. also, use your own points.