पुढील मुद्द्यांच्या आधारे दिलेल्या विषयावर तुमचे लिहा. वैचारिक लेखन. ग्रामीण सहजीवन.

वैचारिक लेखन 

प्रश्न : 

पुढील मुद्यांच्या आधारे दिलेल्या विषयावर तुमचे विचार लिहा. 

उत्तर : 

ग्रामीण सहजीवन 

           आमच्या गावी आमचे घर आहे. शेती आहे. तेथे आमचे काका राहतात. आम्ही शहरात राहतो. एकदा काका आमच्याकडे चार दिवसांसाठी आले होते. रात्री आम्ही जेवायला बसलो होतो. गप्पाटप्पा जोरात चालू होत्या. काका गावच्या गमतीजमती सांगत होते. हास्यविनोद चालू होते. तेवढ्यात अचानक गावाहून फोन आला. काकांच्या घरात घरफोडी झाली होती. तोडफोडीचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घाव घेतली. गावी घरे दूर दूर असतात. त्याचा चोरटयांनी फायदा घेतला होता. परंतु आरडाओरडा करून लोकांनी सर्वाना गोळा केले. चोरांशी झट्पट केली. त्यानं चोप दिला आणि पोलिसांकडे सुपूर्द केले. काका धावतपळत गावी गेले. स्वतः च्या जीवाची पर्वा न करता गावकरी चोरांना भिडले होते. शेजाऱ्यांमुळे खूप मोठी हानी टाळली होती. काकांचा उर भरून आला. त्यांनी हात जोडून सर्वांचे आभार मानले. " आहो, आभार कसले मानता ? आज तुमच्यावर पाळी आली उद्या आमच्यावर हि येऊ शकते. सर्वानी एकमेकांना मदत केली, तर आपले सगळ्यांचेच भले होईल " लोकांनी काकांना समजावले.
            लोकांचे हे म्हणणे खरेच होते. ग्रामीण भागात लोकच लोकांचे रक्षण करतात. आमच्याशी गावी तर दिवसा दार लावताच नाहीत, तरी कोणाच्याही घरी चोरी होत नाही. मुले तर या घरातून त्या घरात धावपळत पकडापकडीचा खेळ खेळात असतात. एखादा पदार्थ वा वस्तू अचानक अवेळी हवी झाली, तर लोक शेजाराकडे हक्काने जातात. घरपरतण्यासारखी कामे तर सहकार्यानेच होतात. सर्वजण एकत्रपणे एकेकाचे घर परतत जातात. त्यामुळे एका दिवसात एकेक घराची कवले काढून पुन्हा लावली जातात. कोणाच्याही घरातील धार्मिक कार्याला आवश्यकतेप्रमाणे सर्वजण सहकार्य करतात. आजारपणात हमखास मदत केली जाते. पहिला पाऊस पडतो, त्या वेळी एखाद्या घरातील कर्ता माणूस आजारी पडतो तर बाकीचे सर्वजण विचारविनिमय करून त्या माणसाचे शेत नांगरून देतात. अशा वेळी कोणीही कुरकुर करीत नाही. कारण अशी वेळ कोणावरही येऊ शकते, याची जाणीव सर्वांना असते. 
            मला नेहमी याचेच कुतूहल वाटत राहते की, ग्रामीण भागात हे कसे काय घडते ? मी पाहतो की तेथे गावातील सर्व माणसे एकमेकांना पूर्णपणे ओळखतात. सर्वांच्या नातेवाइकांसकट सर्व माहिती सगळ्यांना असते. सर्वाना एकमेकांबद्दल जिव्हाळा असतो. एखाद्याने काही खास कर्तबगारी दाखवली, तर गावातल्या सगळ्यांना ती स्वतः च कर्तबगारी वाटते आणि त्यांची छाती अभिमानाने फुगून जाते. 
            वास्तविक पाहता गावात अनेक बाबींची कमतरता असते. वाहतूक सेवा, आरोग्य सेवा; पाणी, वीज, जीवनउपयोगी वस्तू यांचा पुरवठा; शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी इत्यादी सर्वच बाबतींत उणीव असतात. त्यामुळे लोक हतबल, काही प्रमाणात निराश झालेले असतात. त्यामुळेच बहुतेक त्यांना एकमेकांच्या सहकार्याची गरज भासते. अडचणींच्या वेळी एकमेकांच्या मदतीला धावून गेले पाहिजे, हे त्यांना मनोमन जाणवलेले आहे. या कारणांनी सगळेजण स्वतःचे जीवन इतरांच्या जीवनाशी जुळवून घेतात. आपले विचार, कल्पना, स्वप्ने, सुखदुःखे, अडीअडचणी इत्यादींशी संपूर्ण ग्रामीणजीवन जोडून घेतात. किंबहुना तशी जगण्याची रीतच निर्माण करतात. ग्रामीण सहजीवनाचा हाच मुख्य आधार आहे. 

Comments

Other posts

बेडूक - विहीर - समुद्र, मोठे, संकुचित.

पर्यटक या नात्याने बाळकृष्ण पर्यटन, सांगली या संस्थेकडे काश्मीर सहल माहितीपत्रकाचे मागणी करणारे पत्र लिहा.

प्लास्टिक - वापरावर मर्यादा - पर्याय - जनजागृती , दिलेल्या सूचक शब्दांवर आधारित बातमी.

One night, my sleep was suddenly disturbed by some strange noises coming from the direction of the drawing room... - Developing a story.

You are Kedar/kirti More, staying at 5, Gulab Niwas, Wadgaon Village, Ratnagiri, 415 709. Write a letter to your friend telling him how you celebrate cleanliness week. Make use of points given in the poster. also, use your own points.