पुढील मुद्द्यांच्या आधारे मोबाइलला तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून लिहा. आत्मकथन. मी मोबाइलला बोलतोय.
आत्मकथन
प्रश्न:
पुढील मुद्द्यांच्या आधारे मोबाइलला तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून लिहा.
उत्तर:
मी मोबाईल बोलतोय !
हॅलो, हॅलो ! मी मोबाइलला बोलतोय ! मी तुमचा मोबाईल ! आज मी काहीसा खट्टू झालो होतो. सगळीकडून माझ्यावर दोषारोप वहाहयचे. मी मुलांना बिघडवतोय. थोरांना नादाला लावतोय. उपयोग कमी आणि कोडकौतुक फार, असे अनेक आरोप माझ्यावर होत होते.
तस पहिले तर काही अंशी ते खरेच होते. मूळ अभ्यास किंवा महत्वाची कामे सोडून माझ्याशी खेळत बसायचे. मोठी माणसेही माझा दुरुपयोग करीत होतीच तासंतास गप्पा मारणे, निरर्थक एसेमेस पाठवणे हे सर्रास चाले. माझ्यावर आलेल्या माहितीची सत्यता तपासून पाहण्याची तसदी घेत नाही. लगेच माहिती दुसर्यांना पाठवतो. त्यामुळे अफवा पसरतात. काही ठिकाणी तर यांमुळे तंटे उभे राहिले आहेत. रस्त्याने चालताना किंवा गाडी माझ्या साह्याने बोलण्यामुळे अनेकदा गंभीर प्रसंग उद्भवले आहेत. मला कानाशी लावून रास्ता ओलांडताना किंवा रेल्वे रूळ ओलांडताना काहीजणांनी प्राण गमावले आहेत. काहीजणांनी अनेकांची बेअब्रू करण्यासाठी माझा उपयोग केला आहे. या सर्व बाबींमुळे माझी बदनामी खूप झाली.
मित्रांनो, माझी किती उपयोग सांगू ? अनेकांना व्यवसायासाठी, राजकीय व सामाजिक प्रचारासाठी फेसबुकचा उत्तम उपयोग केला आहे. काही मोठे गुन्हे फेसाबुकमुळे उघडकीला आले आहेत. फेसबुकप्रमाणे यो-ट्यूब, टॅबलेर, पिंटरेस्ट, लिंक्डईन यांसारख्या संकेतस्थळांचा वापर हि उपयोगी ठरला आहे. आता ' व्हॉट्सअँप ' हे अँप्लिकेशन खूपच लोकप्रिय होत चालले आहे.
माझ्यामुळे तुम्ही तुमचे कागदपत्र, फोटो, व्हिडिओ स्वतः च जतन करू शकता पाठवू शकता. इतकेच नव्हे, तर स्वतः च स्वतः चा चित्रपट तयार करू शकता. नोकरीसाठी आपण आपली माहिती पाठवतो, तशी माहिती तुम्ही स्वतः च कथन करतानाचे चित्रीकरण करून पाठवू शकता. नोकरीसाठी आपण आपली माहिती पाठवत, तशी माहिती तुम्ही स्वतः च कथन करतानाचे चित्रीकरण करून पाठवू शकता. विद्यार्थाना विविध शैक्षणिक सूचना, निकाल प्रभोधनपर माहिती तुमच्यापर्यंत सहज पोहोचवू शकतो. परंतु माझ्या अतिप्रभावशाली राहू नका. आवश्यक तेव्हाच माझा उपयोग करा.
तुम्हाला माहिती आहे का ? मी तुम्हाला तुमच्या खात्यातून कोणालाही पैसे देण्यास मदत करू शकतो. हॉटेल, दुकान यांच्या तर बिलांचे पैसे द्यायला मदत होतेच. पण अगदी रस्त्यावरच्या भाजीवाल्याचे पैसे द्यायलाही माझी मदत होऊ शकते. आता माझ्यामुळे तुमची बँक तुमच्या खिशात असेल.
मित्रांनो, खरं तर यावर मी तासंतास बोलू शकतो. पण आज एवढच पुरे !
Comments
Post a Comment