अकस्मात पडलेला पाऊस या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा. - प्रसन्गलेखन
प्रसन्गलेखन
प्रश्न :
'अकस्मात पडलेला पाऊस' या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
उत्तर :
अकस्मात पडलेला पाऊस
या दिवशी भयंकर उकडत होते. सकाळी सहा वाजता सुद्धा अंगातून होत्या. जसा जसा लागला, तसा तसा उकाड्याने जीव हैराण होऊ लागला. पंख्याखाली उभे राहिले तरी केसांतून, हनुवटीखालून मानेवर घामाच्या धारा वाहत होत्या. जीवाची काहिली होत होती. बसून पहिले. उभे राहून पाहिले. टीव्ही पाहायचा प्रयत्न केला. तरीही मन तगमगत राहिले. चैनच पडत नव्हती.
तेवढ्यात, भर दुपारी असतानाही अंधारून आले. आभाळभर काळेकुट्ट ढग जमा झाले. जोराचा गार गार वार सुटला. जमिनीवरील कागदकपटे, पालापाचोळा लागला. आभाळभर पाऊसच पाऊस होता. घराशेजारी, रस्त्यावर, शेतात, डोंगरात, दरीत, सर्वत्र पाण्याचे लोट्याच्या लोट सुसाट धावू लागले. एखाद्या अवखळ दांडगट मुलाप्रमाणे पाऊस हुंदडत होता. आम्ही मुले सुद्धा त्यांच्या अवखळपणात सामील झालो. मनसोक्त नाचू लागलो. ख्खारे सांगू का ? पाऊस आणि आम्ही एकत्रच नाचत होतो.
हा अनुभव वेगळा होता. एरवी असा पाऊस आला कि आम्ही पटापट घरात घुसतो. दरोखिडक्या लावून घेतो. रस्त्यावर असलो कि रेनकोट घालतो. छत्र्या उघडतो. पाऊसाचा फारचं जोर असला तर दुकानांचा, हॉटेलचा आसरा घेतो. आज मात्र वेगळेच घडत होते. पाऊस आणि आम्ही एकत्रच होतो. आम्ही पाऊसात शीरलो होतो कि पाऊस आमच्यात शिरला होता, हे सांगणं कठीण होते. सर्व भोवताल पाऊसमय झाला होता. झाडे तर शेंड्यांपासून मुळांपर्यंत पाण्याने निथळत होती. मऊ मित्रमंडळांकडे पहिले. सगळेजण झाडांप्रमानेच निथळत होते. कानांवरून, नाकाच्या शेंड्यांवरून, हनुवतींवरून पावसाचे थेम्ब सरसरत उतरत होते. ते दृश्य मनाला आनंद देत होते.
पावसाच्या त्या शीतलस्पर्शाने जीव सुखावला होता. मन निवांत झाले होते. आता थोड्या वेळापूर्वी मनाची अवस्था काय झाली होती ? आणि आता पहा. पावसाने केवढा कायापालट केला होता ! हि किमया फक्त पाऊसच करू शकतो. पाऊस हा ईश्वराचाच अवतार आहे. नाहीतर,मनाच्या आत खोलवर स्पर्श करण्याची ताकद आणखी कोनात आहे ?
O bro wow I want to collab with you
ReplyDeletewe will bother
Delete