आई, बाबा, मुलगा, पैसे, हरवणे, मुलावर संशय - दुसऱ्या दिवशी पैसे मिळाले - कारण समजल्यावर सगळे आश्चर्यचकित. - कथालेखन , दिलेल्या शब्दांवरून कथालेखन करा.
कथालेखन
दिलेल्या शब्दांच्या आधारे कथालेखन करा :
प्रश्न :
आई, बाबा, मुलगा, पैसे, हरवणे, मुलावर संशय - दुसऱ्या दिवशी पैसे मिळाले - कारण समजल्यावर सगळे आश्चर्यचकित.
उत्तर :
सगळ्यांचे असतात, मग माझे नकोत काय ?
दुसरीच्या त्या वर्गातला निखिल हा शाळेत सगळ्यांचा लाडका होता. अत्यंत प्रामाणिक, सतत हसतमुख व सर्वांशी प्रेमाने वागणारा, कोणाशी कधी भांडण नाही तंटा नाही. कोणाला कधी उलटून बोलणे नाही. दुसऱ्याला मदत करायला तत्पर. मनमिळाऊ. त्याच्या या स्वभावगुणांमुळे तो सगळ्यांना आवडायचा. त्याचे आईबाबाही त्याच्यावर खुश होते. त्याचे आईबाबा, आजीआजोबा यांनी त्याच्यावर संस्कारच ताशे केले होते. ते घराचं प्रामाणिक व सज्जन माणसाचे होते.
एके दिवशी निखिलची आई काम आटोपून हात पुसत पुसत स्वयंपाकघरात आली. तिच्या डोक्यात कामाची आखणी चालू होती. काहीजणांना पैसे द्यायचे होते. त्यासाठी ती आता पाकिट तयार करणार होती. पाकिटांवर नावे लिहून त्यांना द्यायचे पैसे त्या त्या पाकिटात घालून ठेवणार होती. ती हात पुसतच कपाटाकडे गेली. कपाट उघडले. त्यातला खान उघडला आणि तिला धक्काच बसला. शंभर रुपयांचे नोटांचे बंडल गायबच होते !
तिने संपूर्ण कपात तपासले. पण नाही ! मग तिने निखिलच्या बाबांना विचारले, "अगं, मीच तुझ्याकडे दिले. मग मी कशाला घेईल ?" ते म्हणाले. तिने नंतर निखिलच्या आजीआजोबांना घाबरत घाबरत विचारले. पण त्यांनी ते पाहिलेले नव्हते. मग तिने स्वयंपाक करणाऱ्या काकूला विचारले. पण छे ! कोणालाही काहीच माहिती नव्हते.
तेवढ्यात निखिल खेळून परतला. आईने त्याला विचारले, निखिलने निरागसपणे सांगितले, "माझ्याकडे आहेत ."
आई: अरे, पण तू का घेतलेस ?
निखिल: मला हवे होते.
आई: तू मला का नाही सांगितलेस ?
निखिल: त्यात काय सांगायचे.
आई: तुला कशाला हवे होते ?
निखिल: अग, बाबांचे पैसे असतात, तुझे पैसे असतात. आजीआजोबांच्या पैसे असतात. मग माझे नकोत काय ?
सगळे त्याच्याकडे आ वासून बघताच राहिले.
its not blogger ...its vlogger😂
ReplyDeleteThere are both things Blogger and vlogger.vlogger makes videos and blogger uploads blog and photos. Don't say anything without any knowledge 😃
DeleteThanks you bhai
ReplyDeletewelcome brother
DeleteThanks
ReplyDeletewelcome
Delete