सेल्फी काढताना जीव गमावला. मुंबईतील महिला पर्यटकाचा माथेरान येथे दरीत पडून मृत्यू. - बातमीलेखन.

बातमीलेखन 

पुढील घटनेवर बातमी तयार करा :

प्रश्न :- 

अविचाराने ओढवला भीषण अपघात !

सेल्फी काढताना जीव गमावला...
मुबईतील महिला पर्यटकाचा माथेरान येथे दरीत पडून मृत्यू 

उत्तर :-

सेल्फी काढताना जीव गमावला...

(आमच्या वार्ताहराकडून) 

           माथेरान, दि. १२ जुलै : काल रोजी संध्याकाळची एका पर्यटक महिलेला सेल्फी काढताना जीव जमाव लागला. सदर महिला मुंबईहून येथे फिरण्यासाठी आली होती. सेल्फी काढण्याच्या गुंगेत ती १२०० फूट खोल दरीत कोसळली व तिचा मृत्यू झाला. सुमारे चार तासांच्या प्रयत्नांनंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. वंदना चव्हाण (३२) असे या महिलेचे नाव असून माथेरानच्या लुईस पॉईंट येथे हि घटना घडली. 
           पावसाळ्याच्या निसर्गरम्य वातावरणात अनेक पर्यटकांची पावले माथेरानकडे वळतात. मुंबईतील चव्हाण कुटुंब आपल्या दोन मुलींसह माथेरानला पर्यटनाला आले होते. सायंकाळी हे सर्वजण माथेरानच्या प्रसिद्ध लुईसा पॉईंट येथे फिरायला गेले होते. या वेळी वंदना या आपल्या पतीसमवेत कड्याजवळ उभे राहून सेल्फी काढत असताना, जोरदार वाऱ्यामुळे वंदना यांचा तोल गेला आणी त्या १२०० फूट खोल दरीत कोसळल्या.
           या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघात झालेल्या कुटुंबियांना साहाय्य केले. सेल्फीच्या मोहात पडून आजवर अनेक पर्यटकांनी आपले जीव आहेत. सेल्फीचा मोह टाळावा आणि सुरक्षितपणे पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन पोलीस आय्क्तांनी पर्यटनप्रेमींनी केले आहे. 

Comments

Other posts

बेडूक - विहीर - समुद्र, मोठे, संकुचित.

पर्यटक या नात्याने बाळकृष्ण पर्यटन, सांगली या संस्थेकडे काश्मीर सहल माहितीपत्रकाचे मागणी करणारे पत्र लिहा.

प्लास्टिक - वापरावर मर्यादा - पर्याय - जनजागृती , दिलेल्या सूचक शब्दांवर आधारित बातमी.

One night, my sleep was suddenly disturbed by some strange noises coming from the direction of the drawing room... - Developing a story.

You are Kedar/kirti More, staying at 5, Gulab Niwas, Wadgaon Village, Ratnagiri, 415 709. Write a letter to your friend telling him how you celebrate cleanliness week. Make use of points given in the poster. also, use your own points.