विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून भांबुर्डे पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी महिलांची छेडछाड थांबवल्या बद्दल त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
पत्रलेखन
अभिनंदन पत्र
पुढील फलक वाचा व सूचनेनुसार कृती करा.
प्रश्न :-
विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून भांबुर्डे पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी महिलांची छेडछाड थांबवल्या बद्दल त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
उत्तर :-
दिनांक :- १८ जुन २०२१
मा. अविनाशकाका,
सप्रेम नमस्कार,
सुरुवातीला तुमचे मनापासून अभिनंदन आणि तुम्हाला खुप खूप धन्यवाद !
गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर बाजरपेठेत मवाली टोळके महिलांना खूप त्रास देत होते. अर्वाच्य शब्दांत बडबड करणे. महिलांना धक्के मारणे इत्यादी कामांना होता.
तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये याबाद्दल तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी त्वरित कारवाही केली. ते टोळके पकडले गेले. एवढेच नव्हे तर, महिला पोलीस तेथे गस्त घालू लागल्या.
काका, तुम्ही माझ्या मैत्रिणीचे बाबा आहात, त्यामुळे तर मला तुमचा खूप अभिमान वाटला. आम्हा विद्यार्थिनींना तुम्हाला खुप मनापासून धन्यवाद द्यावेशे वाटतात.
कळावे,
आपली नम्र,
पूर्व खांडेकर
१५, अभिनव सोसायटी,
सुतार आळी,
कोल्हापूर - ४१६ ०१२.
ई-मेल :- abc@xxxx.com
Comments
Post a Comment