अभिनव विद्यामंदिर, कोल्हापूर यांचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी वाहतूक नियंत्रण उपायुक्तांना विनंतीपत्र लिहा - पत्रलेखन लिहा.
पत्रलेखन
विनंतीपत्र
पुढील फलक वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.
प्रश्न -:
अभिनव विद्यामंदिर, कोल्हापूर यांचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी वाहतूक नियंत्रण उपायुक्तांना विनंतीपत्र लिहा.
उत्तर -:
दिनांक : १५ जानेवारी २०२१
प्रति,
मा. उपायुक्त,
रस्ते वाहतूक विभाग,
कोल्हापूर परिमंडळ,
कोल्हापूर - ४१६०१२.
विषय : रस्ते वाहतूक नियमासंबंधी मार्गदर्शन करणे.
महोदय,
मी अभिनव विद्यामंदिरचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणांस पत्र लिहीत आहे.
आम्ही दरवर्षी शाळेत विविध उपक्रम पार पाडतो. या वर्षीय आम्ही आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांसंबंधी जागृती निर्माण करणारा उपक्रम करण्याचे योजले आहे. आपण आमच्या शाळेत येऊन आम्हा विद्यार्थ्यांना वाहतुकीसंबंधी एक मार्गदर्शनपर व्याख्यान द्यावे, अशी नम्र विनंती.
मागील आठवड्यात आपली दूरदर्शनवरील मुलाखत पहिली. त्या मुलाखतीत आपणं काही गोष्टी खूपच सुंदर रीतीने समजावून सांगितल्या. त्यामुळे आम्ही प्रभावित झालो असून आपणच व्याख्यान देण्यासाठी यावे, अशी आमची तीव्र इच्छा आहे. आम्हाला हा उपक्रम फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित करायचा आहे. कृपया त्या आठवड्यातील सोयीची तारीख कळवावी, म्हणजे आम्हाला त्यानुसार तयारी करता येईल.
हे पात्र मिन मा. मुख्याध्यापकांच्या अनुमतीनुसार पाठवत आहे.
आपली/आपला नम्र,
अ. ब. क.
(विद्यार्थी प्रतिनिधी)
अभिनव विद्यामंदिर,
महाद्वार रोड,
कोल्हापूर - ४१६ ०१२.
ई-मेल : abc@xxxx.com
Comments
Post a Comment