पुढील मुद्द्यांच्या आधारे 'आरसा' या घटकाचे आत्मकथन लिहा / करा ; आरसा या विषयावर आत्मकथन .

आत्मकथन 

प्रश्न :-

पुढील मुद्द्यांच्या आधारे 'आरसा' या घटकाचे आत्मकथन लिहा / करा :

उत्तर :-

मी आरसा बोलतोय 

           मी माझी मिशी निरखत होतो. ती अस्फुट अस्फुट दिसू लागली होती. कसा आकार होईल तिचा? मला मिशी हवी थोडीशी रुंद. ओठांवरून किंचित उतरत उत्तरत येणारी आणि ओठांच्या टोकांवर येताच झटकन खाली वळणारी. माझ्या मिशीचा आकार मला हवा तसा मिळाला तर मी कसा दिसेन? मी कोणाकोणाला आवडेन? माझ्या डोळ्यांसमोर काही चेहरे तरळू लागले. मी गुंग होत गेलो. खळखळून हसण्याच्या आवाजाने माझ्या समाधीचा भंग झाला. मी चटकन इकडे तिकडे पहिले. पण समोरचा आरसा मला पाहत माझ्यावर हसत  होता. हे कळायला फार वेळ लागला नाही.
           "वा ! वा !  किती छान गुंग झाला होतास, नाही का? पण ते जाऊदे. तुम्हां माणसांना स्वप्न दाखविण्यासाठीच  जन्म झाला आहे ! 
           "हे बघ. प्रत्येक माणसाचं स्वतः वरच सर्वात जास्त प्रेम असतं. आपण इतरांपासून काही वेगळे दिसावं म्हणून प्रत्येक जण काहीतरी वेगळी कृती, कोणीही न केलेली नवीनच कृती करण्याच्या प्रयत्नात असतो. या धडपडीतूनच माणसाने या पृथ्वीतलावर अनंत पराक्रम गाजविले आहेत. म्हणून तर माणूस आज सर्व प्राण्यांचा राजा, या पृथ्वीचा राजा म्हणून वावरतोय. या पराक्रमी माणसांनी आपल्या प्रत्येक पराक्रमानंतर आरशात स्वतः ला पाहिले असणारच आणि पाहता पाहता मुठी आवळून, हात उंचावून ' माझा विजय असो ' अस मोठ्याने मनातल्या मनात घोषणा देत स्वतः चा जयजयकार केला असणारच, हे लक्षात ठेव. तुमच्या मनातल्या या प्रेरणेचा निर्माता मीच आहे. मीच तुमची प्रगती घडवून आणतो.
            "आठवते का रे? जत्रेत आपली भेट झाली होती ! किती विविध रूपांत मी त्या आरसे महालात अवतरलो होतो ! तू तर नुसता लोटपोट हस्त होतास. तुझ्याच किती प्रतिमा पाहायला मिळाल्या होत्या ! गोलगरगरीत, हडकुळी, एकदम बुटकी ! किती प्रतिमा ! एक आरशातली प्रतिमा आठवते? डोकं मोठं भोपळ्याएवढं. बाकीचा देह दोन-अडीच फूट फक्त ! काय हसत होता तुम्ही सगळेजण !
            "लक्षात ठेव, हि माझी रूप केवळ विनोद करण्यासाठी निर्माण झालेली नाहीत. ड्रॉयव्हरला पाठीमागून येणाऱ्या गाड्या दाखवण्यासाठी मीच तर गाडीच्या कडेवर बसतो. वेगवेगळी भिंगे हि माझीच रूपे आहेत. प्रयोगशाळेतल्या सूक्ष्मदर्शकापासून अवकाशातल्या ग्रहगोलांचे निरीक्षण करणाऱ्या दुर्बीजनापर्यंत सर्वत्र मीच असतो. घरात, दारात, कपड्यांवर, दुकानात, रस्त्यांवर, गाड्यांमध्ये, जत्रांमध्ये, इथे तिथे सर्वत्र मीच असतो. पण लक्षात ठेव, मी कधी स्वतः च्या मिजाशीत राहिलो नाही. 
            पाणी पिण्यासाठी माणूस प्रथम नदीत वाकला तेव्हा त्याला स्वतः ला स्वतः चे दर्शन घडले असणार. तेव्हापासून मी त्याच्यासोबत आहे. मी स्वतः ला बाजूला ठेवून माणसाला मदत केली आहे. तुसुद्ध अशीच मदत करीत राहा. पहा, केवढा मोठा होशील तू ! " 

Comments

Other posts

बेडूक - विहीर - समुद्र, मोठे, संकुचित.

पर्यटक या नात्याने बाळकृष्ण पर्यटन, सांगली या संस्थेकडे काश्मीर सहल माहितीपत्रकाचे मागणी करणारे पत्र लिहा.

प्लास्टिक - वापरावर मर्यादा - पर्याय - जनजागृती , दिलेल्या सूचक शब्दांवर आधारित बातमी.

One night, my sleep was suddenly disturbed by some strange noises coming from the direction of the drawing room... - Developing a story.

You are Kedar/kirti More, staying at 5, Gulab Niwas, Wadgaon Village, Ratnagiri, 415 709. Write a letter to your friend telling him how you celebrate cleanliness week. Make use of points given in the poster. also, use your own points.