तुफान आलं... अन गाव पाणीदार झालं..., घटनेवर आधारित कृती.
बातमीलेखन
घटनेवर आधारित कृती
प्रश्न :
तुफान आलं... अन गाव पाणीदार झालं...
उत्तर :
गाव पाणीदार झालं !
(आमच्या वार्ताहराकडू)
सातारा, दि. १० जून : मे महिन्याच्या अखेरीस वळवाचा पाऊस तुफानाच्या रूपात आला आणि कुकुडवाडी गाव पाणीदार झाले. कायम दुष्काळ ग्रस्त असणारे गाव वाळव्याच्या पावसाने काही वेळातच पाण्याने भरले. गावकऱ्यांच्या बरोबर शहरात व परदेशात राहणाऱ्या ग्रामस्थांनीही या समाधान व्यक्त केले.
या सर्वाना आनंदित होण्याचे कारणही तसेच होते. साऱ्या गावकऱयांनी एकत्र येऊन कुकुडवाडी गावातील केली आहे.
गेले दोन महिने सगळ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून लाखो लिटर पाणी वाचेल एवढे चर खणले. बंधारे बांधले. डोंगरातून येणारे पाणी बंधाऱयांमुळे अडविले जाईल अशी योगन केली. या सर्व मेहनतीचे फळ गावाला मिळाले. भविष्यात येणाऱ्या पावसामुळे गावातील पाण्याचे दुर्भिक्ष मिटेल.अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
कायम दुष्काळग्रस्त असणार हे गाव पाण्यानं भरल्यामुळे आजूबाजूंच्या गाव पर्यंत ही बातमी पोहोचली. कुकुडवाडी गावातील ही जल साक्षरता पाहून, तालुक्यातील अनेक गावे प्रभावित झाली आहेत. श्रमदानाने आपल्याला गावातील पाण्याचे डुमिक्स कमी करू शकतो, असा विश्वास गावकर्यांना वाटू लागला आहे. तालुक्यातील अनेक लोक बंधारे पाहण्यासाठी गावाला भेट देऊ लागले आहेत.
Good 👍 job
ReplyDeletethank you
Delete