शाळेचा विद्यतार्थी या नात्याने गावकऱ्यांच्या या त्रासातून मुक्तता करण्यासाठी फणसवाडीचे विद्यार्थी श्रमदानने रास्ता दुरुस्त करू इच्छितात. यासंबंधीच्या विनंती करणारे पत्र मुख्याध्यापकांना लिहा.
विनंती पत्र
खालील बातमी वाचा आणि सूचनेनुसार कृती करा :
रस्त्यावरील खड्ड्यामुळे असती उलटली !
फणसवाडी दि. १७ : चालक रस्त्यावरील मोठ्या मोठ्या खड्ड्यांतून
मार्ग काढण्याची प्रयत्नात असताना एसटीचे एक चाक
घसरले आणि भलीमोठी एसटी बस उलटून आडवी झाली.
यात १५ प्रवासी जखमी झाले. त्यामुळे एकच हलकल्लोळ मजला होता.
प्रश्न :
शाळेचा विद्यतार्थी या नात्याने गावकऱ्यांच्या या त्रासातून मुक्तता करण्यासाठी फणसवाडीचे विद्यार्थी श्रमदानने रास्ता दुरुस्त करू इच्छितात. यासंबंधीच्या विनंती करणारे पत्र मुख्याध्यापकांना लिहा.
उत्तर :
दिनांक : १५ एप्रिल २०२१
प्रति,
मा. मुख्याध्यापक,
फणसवाडी विद्यामंदिर,
फणसवाडी, ता.- नांदेड,
जि.- नांदेड - ४३१ ६०१.
विषय : फणसवाडीचे रस्त्याची श्रमदानाने दुरुस्ती करणे.
महोदय,
सादर प्रणाम,
मी आपल्या शाळेतील १०वी या वर्गात शिकत आहे.
नुकत्याच झालेल्या एस.टी. अपघातामुळे आपल्या गावातील रस्त्याची दुर्दशा चव्हाट्यावर आली आहे. ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती व शाळकरी मुले यांना रस्त्यावरून चालताना भीती वाटते. खड्ड्यांमधून चालणाऱ्या गाड्या तर कोणत्याही क्षणी कोलमडतील, असे वाटून छातीत धडधडते.
या परिस्तितीतून मार्ग काढण्याचे आम्ही विद्यर्थ्यांनी ठरवले आहे. आम्ही श्रमदानाने हा रास्ता वाहनांना जाण्यायोग्यजोगा करण्याचे ठरवले आहे. काही गावकऱ्यांनी आम्हाला कुडाळी, फावडी व घमेली पुरवण्याचे आश्वासन दिले आहे.
या संदर्भात आपणाला विनंती अशी की, आपण आम्हा विद्यार्थ्यांना या श्रमदानात सहभागी होण्यास परवानगी द्यावी. येत्या शनिवारी रवीवारी आम्ही श्रमदान करण्याचे योजले आहे. तरी शनिवारी आम्हाला अनुपस्थिती राहण्याची परवानगी द्यावी, ही नम्र विनंती. सहभागी विद्यार्थ्यांची यादी सोबत जोडली आहे.
कळावे,
आपला कृपाभिलाषी,
अ. ब. क.
मु. पो. फणसवाडी,
ता.- नांदेड,
जि.- नांदेड- ४३१ ६०१.
ई-मेल- yrl@xxxx.com
Thanks sir, sir can I use this topic on my blog
ReplyDelete