मैत्रीण/मैत्र या नात्याने श्रमदानाने रस्ता दुरुस्त करताना फणसवाडीच्या मित्राला/मैत्रिणीला छोटा अपघात झाला आहे. त्याची/तिची चौकशी करणारे कौटुंबिक पत्र तयार करा
कौटुंबिक पत्र
पुढील बातमी वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा :
रस्त्यावरील खड्ड्यामुळे असती उलटली !
फणसवाडी दि. १७ : चालक रस्त्यावरील मोठ्या मोठ्या खड्ड्यांतून
मार्ग काढण्याची प्रयत्नात असताना एसटीचे एक चाक
घसरले आणि भलीमोठी एसटी बस उलटून आडवी झाली.
यात १५ प्रवासी जखमी झाले. त्यामुळे एकच हलकल्लोळ मजला होता.
प्रश्न :
मैत्रीण/मैत्र या नात्याने श्रमदानाने रस्ता दुरुस्त करताना फणसवाडीच्या मित्राला/मैत्रिणीला छोटा अपघात झाला आहे. त्याची/तिची चौकशी करणारे कौटुंबिक पत्र तयार करा :
उत्तर :
दिनांक : १५ एप्रिल २०२१
प्रिय मित्र सर्वेश,
सप्रेम नमस्कार.
सर्वेश, अरे तुमच्या शाळेजवळ झालेल्या अपघाताची बातमी आणि छातीत चर्र झाले! अखंड एस. टी. उलटून पडली, याचे आश्चर्यही वाटले. त्यातच ज्या रस्त्यामुळे अपघात झाला, तो रस्ता तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रमदानाने दुरुस्त केला ही बातमी वाचली. या बातमीने आनंद झाला.
मित्र, तू त्या शाळेचा विद्यार्थी. त्यामुळे मला कौतुकही वाटले. पण कालच माझा वर्गमित्र निरंजन मला भेटला आणि त्याने मला तुझी बातमी सांगितली. मला काळजीच वाटली. तुही श्रमदानात सहभागी झाला होतास. काम करता तुझा पाय मुरगळला. चांगलाच सुजला. शिवाय तुझ्या गुडघ्याला व खांद्याला बराच मार लागला. हे ऐकून मला खूप वाईट वाटले. आता कसा आहेस ? दुखण्यातून बारा झाला असशीलच. माझी आजून तीन दिवस परीक्षा आहे. ही संपली की तुला भेटायलाच येतोच. स्वतः:ची काळजी घे. सर्व लोकांच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी असतीलच. काकांना व काकुणा माझा नमस्कार सांग.
तुझा मित्र,
सागर
सावली, सहकार नगर,
महात्मा फुले मार्ग,
नांदेड- ४३१ ६०२.
ई-मेल : sagarg@xxxx.com
Good
ReplyDeletethank you
Delete