पनवेलमधील कलात्मक रांगोळी प्रदर्शनाचा शानदार समारंभ साजरा झाला. कार्यक्रमावर आधारित बातमी:
बातमीलेखन
कार्यक्रमावर आधारित बातमी
प्रश्न :
पनवेलमधील कलात्मक रांगोळी प्रदर्शनाचा शानदार समारंभ साजरा झाला.
उत्तर :
पनवेलच्या कीर्तीला कलात्मक झळकी देणारे रांगोळी प्रदर्शन
(आमच्या प्रतिनिधींकडून)
पनवेल, दिनांक xx - "पनवेलच्या महापौर असल्याचा मला आज खूप खूप अभिमान वाटत आहे. पनवेलच्या कलावंतांनी पनवेलच्या सांस्कृतिक वातावरणाला फार मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे," असे भावपूर्ण उदगार महापौर xx xx xx यांनी भव्य प्रदर्शनाचा उदघाटनाची वेळी काढले.
एन. टी. के. ऍकेडमीच्या भव्य आवारात अनोखे रांगोळी प्रदर्शन भरले असून, गेले तीन दिवस ते पाहण्यासाठी रसिकांची अलोट गर्दी झाली. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली.
या रांगोळी प्रदर्शनात सौंदर्यपूर्ण रचनांचेच प्रदर्शन मांडलेले दिसत होते. ठिपक्यांच्या रांगोळ्यांपासून ते पाण्यावरचा रांगोळ्या पर्यंन्त सर्व प्रकारच्या रांगोळ्या तेथे काढलेल्या होत्या. भूमितीच्या आकारांचा उपयोग करून सौंदर्यपूर्ण रांगोळ्या काढल्या होत्या. विविध आकारांचा चौकोनांचा, त्रिकोणांचा व लहान मोठ्या वर्तुळाचा उपयोग करून सौंदर्यपूर्ण रांगोळ्या काढल्या होत्या. त्या रांगोळ्यन्ट मुक्तहस्त आकृत्या होत्या. तसेच वृक्षवेलीही चिरातल्या होत्या. रंग वापरण्याचे कौशल्य तर वाखाणण्यासारखे होते. विविध रंग केवळ वापरण्यासाठी वापरले नव्हते; तर सौंदर्यपूर्ण दृष्टीने त्यांची पाझरून केलेली होती. निसर्गदृष्टे तर हूबेहूबच होती.
रांगोळ्यांच्या रेषांमधील नजाकत व त्यांवरची कलावंतांची हुकूमत पाहून रसिक प्रसन्नचित्त चेहऱ्याने घरी परतत होते.
Comments
Post a Comment