मित्र नात्याने दिव्यांग मित्राला काश्मीर पर्यटनाला नेल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा.
अभिनंदन पत्र
जाहिरात वाचा व सूचनेनुसार कृती करा :
प्रश्न :
मित्र नात्याने दिव्यांग मित्राला काश्मीर पर्यटनाला नेल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा.
उत्तर :
दिनांक : १५ एप्रिल २०२१
प्रिय मित्र अथर्व,
सप्रेम नमस्कार.
या मागील डिसेंबर महिन्यात तुम्ही बरेच जण काश्मीर पर्यटनासाठी गेला होतात. तुमची ही सहल खूप छान झाली असेही कळले.
अथर्व, काश्मीर खूप छान आहे आणि ते कधीही गेलात तरी छानच दिसणार. कारण तो भारताचा स्वर्ग आहे.
मला तुझे खास अभिनंदन करायचे आहे ते यासाठी की, तू आपला मित्र सागर यास सहलीला घेऊन गेलास.
सागर दिव्यांग आहे. त्याला डोळ्याने खूप अंधुक दिसते. त्याचा दावा हातही थोडा अधू आहे. त्यामुळे त्यास सहसा कोणी सहलीला नेट नाही.
परंतु तू आणि तुझ्या मित्रांनी हे आव्हान आनंदाने स्वीकारले.
दहा दिवसांच्या सहलीत त्याची काळजीही घेतलीत आणि त्याला स्थलदर्शन ही घडवलेत. सागरने ह्या सहलीचा खूप आनंद लुटला, असे मला कळले आहे.
तुमचे हे कार्य संभवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. तुमच्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन!
तुझा मित्र,
क. ख. ग.
१५१, कारंडेवाडी, वैजापूर,
औरंन्गाबाद - ४२३ ७०१.
ई-मेल : kkkhg@xxxx.com
Very good
ReplyDeletethank you
DeleteYou written very well
ReplyDeleteAnd
thank a lot of ☺️.
welcome
Delete