अकस्मात पडलेला पाऊस या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा. - प्रसन्गलेखन
प्रसन्गलेखन प्रश्न : 'अकस्मात पडलेला पाऊस' या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा. उत्तर : अकस्मात पडलेला पाऊस या दिवशी भयंकर उकडत होते. सकाळी सहा वाजता सुद्धा अंगातून होत्या. जसा जसा लागला, तसा तसा उकाड्याने जीव हैराण होऊ लागला. पंख्याखाली उभे राहिले तरी केसांतून, हनुवटीखालून मानेवर घामाच्या धारा वाहत होत्या. जीवाची काहिली होत होती. बसून पहिले. उभे राहून पाहिले. टीव्ही पाहायचा प्रयत्न केला. तरीही मन तगमगत राहिले. चैनच पडत नव्हती. तेवढ्यात, भर दुपारी असतानाही अंधारून आले. आभाळभर काळेकुट्ट ढग जमा झाले. जोराचा गार गार वार सुटला. जमिनीवरील कागदकपटे, पालापाचोळा लागला. आभाळभर पाऊसच पाऊस होता. घराशेजारी, रस्त्यावर, शेतात, डोंगरात, दरीत, सर्वत्र पाण्याचे लोट्याच्या लोट सुसाट धावू लागले. एखाद्या अवखळ दांडगट मुलाप्रमाणे पाऊस हुंदडत होता. आम्ही मुले सुद्धा त्यांच्या अवखळपणात सामील झालो. मनसोक्त नाचू लागलो....